ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आदमापूर येथे उद्या सदगुरु बाळूमामांच्या १३० व्या जन्मकाळ उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :
आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या १३० व्या जन्मकाळ उत्सवानिमित्त बाळूमामा विकास फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर व आदमापूर ग्रा.पं.मार्फत पत्रकारांचा सन्मान, या कार्यक्रमाचे आयोजन आदमापूर येथे रविवार, दि. १७ रोजी करण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या या रक्तदान शिबिराचे हे २० वे वर्ष आहे. आतापर्यंत ४ हजार रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.