ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सर्वधर्मीय जयंती समिती,परिवर्तन फाउंडेशन व विविध पक्ष,संघटना तर्फे महात्मा फुले यांची जयंती साजरी

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
सर्वधर्मीय जयंती समिती, परिवर्तन फाऊंडेशन व विविध पक्ष,संघटना तर्फे ऐतिहासिक बिंदू चौक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई,माजी महापौर निलोफर आजरेकर,ॲडिशनल एस. पी. तिरुपती काकडे,डीवाय.एस.पी. मंगेश चव्हाण,जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे,आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष आठवले,सलीम विजापूरे,सर्वधर्मीय जयंती समितीचे यूनिस पटवेगार, शिवशाही फाऊंडेशनचे सुनील सामंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे,राज कुरणे,रवी कोल्हटकर,मुबारक आत्तार आदी विविध पक्ष संघटनांचे नेते,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.