पन्हाळा : आकुर्डे येथे उपसरपंचांच्या पत्नीची आत्महत्या

कळे -वार्ताहर अनिल सुतार
आकुर्डे (ता.पन्हाळा) येथील उपसरपंच अनिल पाटील यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सौ.सुरेखा ऊर्फ स्वाती अनिल पाटील (वय ४०) असे त्यांचे नाव आहे.याबाबत कळे पोलीसात नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,अनिल पाटील हे गावचे उपसरपंच आहेत.शिवाय ते काटेभोगाव (ता.पन्हाळा) येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत.आज शनिवारी (ता.१२) रोजी सकाळी शाळा सुटल्यावर अनिल पाटील गावी गेले. अनिल पाटील हाॅलमध्ये तर पत्नी सुरेखा या बेडरुममध्ये विश्रांती घेत होत्या.
दूपारी एकच्या सुमारास अनिल पाटील यांनी पत्नी सुरेखा यांना हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही.बराच वेळ झाल्यानंतर शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला.त्यावेळी सुरेखा यांनी छताच्या हुकाला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
याबाबत सुरेखा यांचे दिर प्रकाश महादेव पाटील यांनी कळे पोलीसात वर्दी दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी स्वतः पंचनामा केला.सुरेखा पाटील यांच्या मागे पती,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार (ता.१४) रोजी सकाळी आहे.पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश शेंडगे अधिक तपास करत आहेत.