संकट गंभीर पण मदतीला जीबीएम खंबीर

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
‘संकट गंभीर पण मदतीला जीबी एम खंबीर’ या ब्रीदवाक्यानुसार गावाबाहेरील महालक्ष्मी तरुण मंडळाचे युवक गडहिंग्लजमध्ये मदत कार्य करीत आहेत. गडहिंग्लजमधील विविध कोरोना सेंटरमधील पेशंट, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन याचबरोबर स्मशानभूमीतील कर्मचारी या सर्वांना जागेवर नाष्टा पोहोचविण्याचे कार्य या युवकांनी हाती घेतले आहे
डॉक्टरांनी कोरोना पेशंटना दिलेल्या डायट प्लान नुसार रोज वेगवेगळा नाश्ता हे युवक स्वखर्चाने पुरवीत आहेत. हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल.रोज 500 लोकांना जागेवर नाष्टा या ग्रुपमार्फत पोहोचविला जातो.
कोणतीही देणगीची अपेक्षा न करता, अथवा कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात न येता या युवकांनी सुरुवातीला स्वतः कडील पैसे घालून हा सामाजिक उपक्रम सुरू केला.त्यांचे हे निष्काम वृत्तीचे कार्य बघून समाजातील सर्व स्तरातून या युवकांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
कोरोनाचं हे संकट गडहिंग्लजच नाही, तर संपूर्ण जगातून नष्ट होवो, आणि पुन्हा सर्वजण मोकळा श्वास घेऊन निर्भयपणे जीवन जगोत” हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थनाही करतं “कौरोना संपूर्ण नष्ट होईपर्यंत हे मदत कार्य आम्ही सुरू ठेवणार आहोत. असे मनोगत यावेळी या युवकांनी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी शिवानंद तुंरबटमठ,अमोल हातरोटे, संदीप कुरबेट्टी, प्रीतम कापसे,संदीप मूर्ती,कुमार नेवडे,श्रावण कोड्ड, संतोष हातरोटे,साहिल लोहार, विनायक आडी, तुषार वाटवे, सुरेश नारापगोळ, सूनील नारापगोळ, शिवकांत किल्लेदार, अनिल फुटाणे, बंटी लोहार, विनायक मुर्ती, उमेश कानडे, उदय कुरबेट्टी, बाळू दळवी, मयूर केसरकर, अभिषेक बागेवाडी, विक्रम अडसुळे, बंटी मोरे, विशाल नेवडे,सागर काकडे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.