ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही – मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी :

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार की नाही हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले.
राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. सर्वपक्षिय बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे सचिव सिताराम कुंटे तसंच राज्यातील विरोधी पक्ष उपस्थिती आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठं विधान केलं आहे. रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर सीताराम कुंटे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. अन्यथा १५ तारखेपर्यंत परिस्थिती भीषण होईल, असं मत कुंटे यांनी व्यक्त केलं आहे.
१५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. अद्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता आहे. तसंच रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कळत नकळत प्रसार हा फार घातक आहे. तरुण वर्ग जास्त बाधित होत आहे हे आढळून येत आहे. आपल्याला रुग्ण वाढ थांबवायची आहे, असं मुखअयमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks