ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा होणार

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. याबाबत शासनाने एक जीआर जारी केला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून 30 ऑगस्ट, 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन (Farmers Day) म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव होतं. सहकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्यातडे बघितलं जायचं. डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या तुकडे बंदी आणि तुकडे जोड विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विखे पाटलांनी प्रवरानगरचा साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्त्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला. विखे पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

सहकार या तत्त्वाच्या क्षमता लक्षात घेऊन, विठ्ठलरावांनी हे तत्त्व आचरणात आणले. शेतकर्‍यांपर्यंत हे तत्त्व नेऊन; अनेक संस्था स्थापन करून सहकाराचा परिचय त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला सुरुवातीच्या काळात करून दिला. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी-बुद्रुक या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. याच गावी त्यांनी 1923 मध्ये ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापन केली. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेली ही आशियातील पहिलीच पतपेढी मानली जाते. यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks