ताज्या बातम्या
लाकूडवाडीचा चेतन मुंबई मेट्रोत ज्युनिअर इंजिनीअर

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
लाकूडवाडी तालुका आजरा येथील चेतन जयवंत देवरकर यांची एम. एम. आर. डी. ए. अंतर्गत मुंबई मेट्रो मध्ये ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी त्याला आई श्रीमती लता, बहीण सौ विजया घोरपडे यांचे मार्गदर्शन तर वडील स्व. जयवंत व आजोबा स्व. जाणबा देवरकर यांचा आशीर्वाद लाभल्याचे त्याने सांगितले.