ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : पोश्रातवाडी येथील नरसु शिंदे यांना पुरस्कार

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
पोश्रातवाडी ता.आजरा येथील सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते नरसु बाबू शिंदे यांना इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी एल.सी.बी. चे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे होते. शिंदे यांचे गेली 8 वर्ष सामाजिक कार्य सुरू आहे त्यानी बाल गुन्हेगारी सह गुन्हेगारी व व्यसनाधीनता रोखण्याचे कार्य केले .
तसेच बहुरूपी ,कोल्हाटी,डोंबारी आदी समाजातील युवकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे कार्य केले आहे .याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी सेन्सॉर बोर्ड संचालक डॉ दशरथ काळे,पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले,भारत श्री अजिंक्य रेडेकर, विजय तोडकर ,प्रथमेश इंदुलकर व मान्यवर उपस्थित होते.