मोहन गोखले यांना “मानद डॉक्टरेट”

मुरगुड प्रतिनिधी :
कुरुकली ता कागल येथील नाविन्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन गोखले यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांच्याकडून सामाजिक कार्याबद्दल “मानद डॉक्टरेट” या पदवीने सन्मानित करण्यात आले. वडील ग्रामपंचायत कुरुकली कडे नळपाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत आहेत तर आई मोलमजुरी चे काम करते विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची आवड लागली यातून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजवादी प्रबोधिनी सारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली .यातूनच सुशिक्षित बेरोजगारीसाठी काम सुरू केले स्त्री भ्रून हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, आजच्या तरुणांसमोरील आव्हाने, उद्योजकता विकास कार्यशाळा, हरवत चाललेली माणुसकी, अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन पर व्याख्याने दिली आहेत.
गोखले यांना आज अखेर विविध संस्था संघटना कडून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
मी माझी पत्नी व सर्व कुटुंबिय येथून पुढच्या काळात सामजिक क्षेत्रात नेहमीच सातत्याने अग्रेसर राहीन विश्व मानवाधिकार आयोग यांच्याकडून मला “मानद डॉक्टरेट” हा बहुमान देण्यात आला तो सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे ही गोखले यांनी वर्तमानपत्राशी बोलताना मत व्यक्त केले .
कोल्हापूर जिल्ह्यातील वयाच्या 25 व्या वर्षी मानद डॉक्टरेट मिळवणारे ते पहिलेच तरूण आहेत, असेही ते म्हणाले.