ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात लस कमी पडू देणार नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे ना. रामदास आठवलेंना आश्वासन

मुंबई प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथानपणामुळे 5 लाख लस वाया गेली आहे. महाविकास आघाडी सरकार च्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत.त्यांचा योग्य वापर करावा; तोपर्यंत केंद्र सरकार आणखी डोसचा पुरवठा लवकरच करणार आहे.महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडू देणार नाही.महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर उभे असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना दिले.
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्याचा चुकीचा आरोप राज्य सरकार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ना.रामदास आठवले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. कोरोना लसीकरणा वरुन राज्य सरकार ने राजकारण करू नये तर योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला केले. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच 1कोटी 6 लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील 5 लाख लसी महाराष्ट्र सरकार ने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण ? असा सवाल करीत राज्य सरकार ने केंद्र सरकार वर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्राला लागेल तेव्हढी लस केंद्र सरकार देणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks