राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेत कागलचे दूर्वा माने,सोहम कांबळे, स्वरित नाटोलकर व बाळेघोलची समृद्धी मोरे सर्वोत्कृष्ट

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री.शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत कागलचे दूर्वा माने,सोहम कांबळे, स्वरित नाटोलकर व बाळेघोलची समृद्धी मोरे हे आपापल्या गटात सर्वोत्कृष्ट ठरले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर,मुरगुड येथे मुरगुड विद्यालय,सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रावर या स्पर्धा रविवारी( ता 23) एकाचवेळी झाल्या. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला .परीक्षक म्हणून रावसाहेब शिंदे नागेश हंकारे अनिल अहिरे पद्माकर कुलकर्णी यांनी काम पाहिले.
पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या. 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
पहिली ते तिसरीच्या पहिल्या गटात कागलच्या स्वामी समर्थ विद्यामंदिरची दूर्वा माने, चौथी ते पाचवीच्या दुसऱ्या गटात विद्यामंदिर बाळेघोलची समृद्धी मोरे, सहावी ते सातवीच्या तिसऱ्या गटात दूधगंगा विद्यालय कागलचा सोहम कांबळे तर आठवी ते दहावी या चौथ्या गटात श्रीमंत जयसिंगराव घाटगे प्रशालेचा स्वरित नाटोलीकर सर्वोत्कृष्ट ठरले.स्पर्धेतील सर्व विजेत्यांना लवकरच समारंभपूर्वक बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
केंद्रनिहाय व गटनिहाय विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत. कंसात शाळेचे नाव .
कागल केंद्र
गट क्रमांक-१
आर्य भाकरे(आयपीएस,कोगनोळी), विनीत पाटील,स्वयंम दिवटे(दोघेही, श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल), कबीर शेख(हाॕलीडेन,कागल), शुभम मगदूम,( श्रीमंत जयसिंगराव घाटगे, कागल).
गट क्रमांक – २
तनया मगदूम (श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल राजवीर चंदनशिवे ( दूधगंगा कागल), अवनी चौगुले, मधुरा पवार, आरोही तायशेटे(सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे, कागल)
गट क्रमांक-३
स्वराज पाटील, कृतिका हेगाजे, अनुष्का मगदूम, श्रेया खराडे,वैदवी पाटील, स्वरा कणसे (सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे, कागल)
गट क्रमांक-४
समी मुल्ला (हॉलिडेन, कागल),
शिवतेज पाटील,अथर्व सुतार (दोघेही श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल) आयुष पाटील (नवोदय, कागल), साची शहा ( श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल)
गट क्रमांक -५
उमेश पाटील, अनुष्का गुडाळे, अनुज कांबळे, सानिका कमते, दिग्विजय पोटले( सर्व राजे दिलीपसिंह घाटगे निवासी कर्णबधिर विद्यालय, कागल)
गट क्रमांक ६
अष्टांग जाधव धूळ सिद्ध शेळके प्रज्वल चव्हाण,साईश पाटील, शैलेश नाईक (सर्व स्व. गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी विद्यालय कागल)
मुरगूड केंद्र
गट क्रमांक -१
आरुष एकल(इंग्लिश मुरगूड), सर्वेश पाटील (सुरूपली), आरोही शिंदे ( शिवाजी मुरगुड), सारा शिकलगार, प्रगती पाटील( दोघीही मंडलिक संस्कार भवन मुरगुड)
गट क्रमांक -२
व्यंकटेश पाटील (मुरगुड विद्यालय), वैभवी रामाने जोया जमादार रचना बरकाळे ( सर्व शिवराज मुरगुड), आरोही लोकरे ( मंडलिक संस्कार भवन मुरगुड)
गट क्रमांक -३
श्रुतिका सुतार(शिवराज मुरगुड ), अन्वेषा सूर्यवंशी( विजयमाला मुरगुड), स्वयं साखळकर ( मंडलिक संस्कार भवन मुरगुड), श्रावणी कुंभार( आणूर),मिथिलेश सुतार (शिवराज मुरगुड ).
गट क्रमांक -४
प्राची पवार, गौरी डुरे,नंदिनी कुंभार, रिंकल तेलवेकर,भाग्यश्री येजरे ( चौंडेश्वरी हळदी)
गट क्रमांक-५
तेजश्री निवृत्ती नेर्ले (श्रीराम शिंदेवाडी)
गट क्रमांक -६
आदित्य मोरबाळे( श्रीराम शिंदेवाडी)
कापशी केंद्र
गट क्रमांक-१
राही बोटे,स्वराली पाटील,रिषभ शिंदे (सर्व बोटे स्कूल कापशी), परिणीती मासोळे,(वि.मं.आलाबाद), आलीजा मुल्लाणी (ऊर्दु आलाबाद )
गट क्रमांक-२
आर्यन कुंभार( बोटे स्कूल कापशी), प्रांजल आडेकर ( जैन्याळ), अनुराग पसारे (वि.मं.मुगळी), वेदांत बागडी (न्यू इंग्लिश स्कूल,मुगळी), प्रणव यादव (न्यायमूर्ती रानडे कापशी)
गट क्रमांक-३
नवोदय पाटील( म्हाळसाकांत अर्जुनी), हर्षल भाईंगडे( न्यायमूर्ती रानडे कापशी),कबीर लाटवडे, विनया लाटवडे,अक्षरा गुडाळे,( सर्व मोहनलाल दोशी अर्जुननगर)
गट क्रमांक-४
सावरी पवार( मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर ),अश्विनी आवळे (न्यायमूर्ती रानडे विद्यालय कापशी), मयुरी भोसले,रोहिणी जाधव,(दोघीही मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर ), सानवी कुंभार (न्यू इंग्लिश स्कूल मुगळी)
गट क्रमांक-६
अर्णव देवटणकर( पंडित नेहरू विद्यामंदिर वडगाव)
कणेरी ता.करवीर केंद्र
गट क्रमांक -१
मनस्वी घाटगे(सौ.आंबुबाई पाटील गोकुळ शिरगाव )मयुरेश घाटगे (विकास सरनोबतवाडी), अनुज शिंदे (ए.पी.आर.एमअँड स्कूल), अनवी चव्हाण (काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम कणेरी), यश कांबळे (आंबुबाई पाटील गोकुव शिरगाव)
गट क्रमांक -२
ध्रुविका हेबाळे, तनवी करडे (दोघीही व्ही.जे पाटील पब्लिक स्कूल),अंकिता पंडित राजर्षी (दोघेही सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव), आरती माळी (उजळाईवाडी)
गट क्रमांक-३
किरणकुमारी पंडित( सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव), श्रावणी सुतार, श्रिया पडसलगी, राजवर्धन भोसले (सर्व काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी), यश माळी केंद्रीय प्राथमिक शाळा कणेरी )
गट क्रमांक-४
संचिता वनकुंद्रे (माध्यमिक विद्यालय नागाव) सृष्टी मगदूम ( काडसिद्धेश्वर हाय.कणेरी), सुमित उकंडे (सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव),संस्कार पोवार,गणराज कांबळे(दोघेही माध्यमिक विद्यालय नागाव)
गट क्रमांक-५
मोहित इगाळे (समर्थ उचगाव)
गट क्रमांक-६
अश्विनी पाटील, आदिती मडिवाळ,प्रकाश हळयापानावर, अंकिता कुंभार ,यश येडगे( सर्व समर्थ विद्यामंदिर उचगाव).