ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील बस्तवडे येथे मशिनचा शॉक लागून एकाचा मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बस्तवडे, ता. कागल येथे पाटील ऑर्गेनिक कंपनीमध्ये काम करीत असताना शिवाजी बंडू चिंदगे (वय ५०, रा. सोनगे, ता. कागल) हे २० जुलै रोजी सायं ५ ते रात्री ९.३० वा. च्यादरम्यान मशीनचा शॉक लागून गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारास ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. याबाबतची वर्दी विजय शिवाजी चिंदगे (सोनगे) यांनी मुरगूड पोलिसांना दिली.