ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : गोकुळ शिरगावात गांजा तस्करी करताना एकाला अटक, 14 हजारांचा गांजा जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोकुळ शिरगाव पोलिसांनी मंगळवारी एका 19 वर्षीय तरुणाला गांजाची तस्करी करताना अटक केली. राज शिवाजी धामणेकर (रा. श्रीराम कॉलनी, उजळाईवाडी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 14 हजार रुपये किमतीचा 560 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, तामगाव (ता. करवीर) परिसरातील बिरोबा माळ येथे विमानतळाच्या भिंतीजवळ एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि राज धामणेकर याला रंगेहाथ पकडले.गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.