ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गारगोटी : हुल्लडबाजी करून पर्यटकांना त्रास देणाऱ्या ५२ तरुणांच्यावर पोलीसांची कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सर्व धबधबे प्रवाहीत झाले असुन, पर्यटकांचे लोंढे धबधब्याकडे जात आहेत. मात्र काही हुल्लडबाज तरूणांकडून पर्यटकांना त्रास होत होता. अशा 52 तरूणांच्यावर गारगोटी पोलीसांनी आज कारवाई केली.
तोरस्करवाडी ता.राधानगरी धबधबा येथे जाणाऱ्या हुल्लडबाज तरुणांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मोहीममध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के,पोलीस नाईक तानाजी डवरी,पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील,विनायक पाटील,सागर साबणे, धनाजी सुतार,श्रीकांत चौगुले सहभाग घेतला.