कागल तालुक्यातील मळगे बु. येथे जागेच्या वादातून मारामारी ; एक जखमी तर १० जणावर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील मळगे बु. येथे जागेच्या वादातून काल मारामारी झाली दहा जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत फिर्यादी सदाशिव तमान्ना वडर वय ६५ रा. मळगे जखमी झाले आहेत. तर एका मोटरसायकलची मोडतोड केली आहे.मुरगूड पोलीसात १० जणांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर हे सर्वजण मुरगूड पोलीस स्टेशन समोर आल्यावर एकमेकावर धावून जावून झोंबाझोंबी करुन आरडाओरड करीत असताना पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करुनही झोंबाझोंबी केल्याबद्दल मुरगूड पोलीसांनी स्वतः फिर्यादी होत ६ जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मळगे बु. येथील सदाशिव वडर व अशोक वडर यांच्यात जागेचा वाद आहे. या वादातूनच काल अशोक तिमन्ना वडर, संतोष तिमन्ना वडर, राणी अशोक वडर, विजय गणपती वडर, रेखा गणपती वडर, शेवंता दगडू वडर, मारुती दगडू वडर सर्व रा. मळगे बु. अतूल दिलीप वडर, अशिष दिलीप वडर, वंदना दिलीप वडर रा. अकोळ ता. चिकोडी या दहा जणांनी जमाव करुन फिर्यादी सदाशिव तिमन्ना वडर व त्यांची सून जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व धमकी देवून फिर्यादीच्या मोटरसायकलची मोडतोड केली आहे. याबाबत वरील दहा जणांच्याविरुध्द मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर हे सर्व जण मुरगूड पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आल्यावर एकेमेकांशी झोंबाझोंबी करुन मोठ मोठ्यांने आरडाओरड करु लागले. हे ऐकून स्टेशन मधील पोलीस रस्त्यावर येवून झोंबाझोंबी थांबवत होते पण त्यांचे न ऐकून घेता झोंबझोबी व वादावादी थांबवली नाही.
याबाबत मुरगूड पोलीस स्वतः फिर्यादी होऊन आकाश सदाशिव वडर, विकास सदाशिव वडर, संतोष तिमन्ना वडर, मारुती दगडू वडर, सर्व रा. मळगे बु., अतुल दिलीप वडर, आशिष दिलीप वडर रा. अकोळ ता. चिकोडी या सहा जणांच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस संतोष शिवराम भांदिगरे यांनी दिली आहे. अधिक तपास पो.ना.माने व पो.हे.कॉ. वर्णे करीत आहेत.