युवा स्पोर्टसच्या वतीने कोव्हीड योद्यांचा सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी ता- कागल येथील युवा स्पोर्टस् गणेश मंडळाच्या वतीने कोरोणा काळात सेवा बजावलेल्या समाजातील विविध घटकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये शिंदेवाडी येथील कोरणा काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल गावातील डॉ. प्रकाश फराकटे,डॉ. बळीराम भुते,डॉ .टी.जी शिंदे ,उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी पुरस्कार सन्मानित रामचंद्र गिरी, दत्तात्रय शिंदे (राधानगरी पोलीस) , विजय मोरबाळे ( पत्रकार ),आशा सेविका -मंगल वंदूरे, कल्पना चौगले ,साधना खराडे, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर ओंकार मोरबाळे ,गावातील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला कु . अजिंक्य मोरबाळे, तसेच गावातील दहावी -बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले . मंडळाने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोव्हीड योद्यांचा व गुणवंताचा सत्कार मंडळांचे ज्येष्ठ सभासद तानाजी खराडे,रवींद्र शिंदे, शिवाजी शिंदे ,सुरेश ढेरे ,सचिन पताडे,विकास शिंदे, नंदकुमार जाधव,वसंत शिंदे,सात्ताप्पा शिंदे, बाजीराव शिंदे,नामदेव शिंदे,पांडुरंग मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी युवा स्पोर्ट्सचे सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, ओंकार खराडे , ओमकार शिंदे,आदित्य शिंदे,इंद्रजित तिरुके, स्वप्नील ढेरे,नितीन शिंदे, नाना शिंदे ,विनायक शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले.तर आभार संतोष जाधव यांनी मानले .