ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Set exam result : सेट परीक्षेचा निकाल जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेचा निकाल ६.५९ टक्के लागला असून, ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे पात्र ठरलेल्यांमध्ये दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा विद्यापीठातर्फे २६ मार्चला घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १ लाख १९ हजार १८३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख १ हजार २५७ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
त्यातील ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले. पात्र ठरलेल्यांमध्ये ३ हजार ५७० पुरुष उमेदवार, तर ३ हजार १०४ महिला उमेदवार आहेत. या परीक्षेसाठी २५ तृतीयपंथी उमेदवारांनीही नोंदणी केली होती. त्यातील दोन उमेदवार पात्र ठरल्याची माहिती विद्यापीठाने दिली.