भारतमाता हायस्कूल शाळेत राज्य क्रीडा दिन साजरा

बिद्री ता. १६ ( प्रतिनिधी : अक्षय घोडके ) :
बिद्री ( ता. कागल ) येथील भारतमाता हायस्कूल शाळेत ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले कांस्य पदक मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी काढण्यात आलेल्या क्रीडाज्योतीचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर क्रीडाशिक्षक एम. जी. फराकटे यांच्या हस्ते पूजन केले. निरोगी दिर्घायुष्यासाठी असणारे खेळाचे महत्व यांविषयी सी. डी. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कबड्डी, लंगडी, आऊट व्हॉलीबॉल, नेट व्हॉलीबॉल असे मैदानी खेळ घेण्यात आले.
कार्यक्रमास टी.आर. पाटील, सौ. जी. ए. डिगरे, सौ. एस. एस. फराकटे, व्ही. आर. कुंभार, एस. एस. माजगावकर, एस. एम. पाटील, आर. व्ही. चौगले, व्ही. डी. वारके, सतीश चव्हाण, अनिल कांबळे, राजेंद्र वारके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.