जिल्ह्यातील सर्व शाळा ३० एप्रिल पर्यंत बंद : किरण लोहार

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद राहतील असा आदेश शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मंगळवारी काढला.तथापि, शाळा बंद कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाइन शिक्षण देण्याची कार्यवाही करावी असे लोहार यांनी म्हटले आहे. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग कोरोना विषयक नियमावलीचे पालन करत बोर्ड परीक्षा होईपर्यंत सुरू ठेवता येतील.
जेणेकरुन आकस्मिक प्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तत्काळ कोरोनासंबंधी कामकाजावर हजर राहता येईल. या सूचनांची अंमलबजावणी करावी असे आदेश त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्राद्वारे दिले आहेत.