ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सांगली : राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात 14 ठिकाणी ईडीची छापेमारी

सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी संबंधित आहे.
दहा वर्षांपूर्वीच्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळती केल्याचा आरोप असल्याचे बोलले जात आहे. हे व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचाही संशय ईडीला आहे. दरम्यान, चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या सीएच्या कार्यालयावर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.