ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी : तळाशी येथे वळणावर ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

तळाशी (ता.राधानगरी) येथील ट्रॅक्टर चालक उद्धव पांडुरंग जाधव (वय-३५) याचा तळाशी प्राथमिक शाळेजवळील वळणाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला. १ जून रोजी बोहल्यावर चढलेल्या उध्दवच्या अंगाची हळद जाण्याअगोदरच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उद्धव माजगाव पाटीजवळील शेतामध्ये शेत मशागतीसाठी असणाऱ्या शेतमजुरांना ट्रॅक्टर मधून सोडण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास बारडवाडी गावी गेला होता.

शेतमजूरांना बारडवाडी गावात सोडून परत येत असताना तळाशी गावाजवळील प्राथमिक शाळेसमोर असणाऱ्या वळणावर ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks