मुरगूड : सर पिराजीराव घाटगे पतसंस्थेच्या सभापतीपदी मनोहर आवटे तर उपसभापतीपदी रामचंद्र गुरव यांची बिनविरोध निवड.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील सरपिराजीराव घाटगे नागरी सहकारी पतसंस्थेची सन 2023 ते 2028 ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
या संस्थेच्या सभापती व उपसभापती निवडीकरिता मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी एस एस पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल हे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते सभापती म्हणून मनोहर गुंडू आवटे तर उपसभापती म्हणून रामचंद्र अनंत गुरव यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार सहाय्यक निबंधक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे संस्थापक एम डी रावण यांनी सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले तर सहाय्यक निबंधक यांचे आभारही मानले. संस्थेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व सभासदांचे , ठेवीदारांचे व हितचिंतकांचे आभार मानले.
यावेळी नूतन संचालक रामचंद्र खराडे ,सुधाकर शेटके, धोंडीराम चौगले ,मारुती लोकरे, कमल गोधडे, अश्विनी हासबे यांच्यासह सचिव अरुण जोशी, डी. ओ. एकनाथ हासबे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.