मुरगुड : बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमांतर्गत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व कामगार कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमांतर्गत चारशे बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. या अभियानात सहाशे जणांची नोंदणी झाली असून त्याचा शुभारंभ बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते पार पडला. सदर सुरक्षा पेटीत चौदा प्रकारचे साहित्य असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या सहकार्याने तसेच कोल्हापूर जिल्हा बांधकाम कामगार आयुक्त विशाल घोडकेसो यांचे सहकार्यातून ,मुरगुड शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश रामाणे यांचेवतीने हा लाभ देण्यात आला.
सुरक्षा साधना अभावी कामगारांची मृत्यू प्रमाण अधिक असल्याने सुरक्षा भेटीला महत्त्व आहे. या बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना देखील देण्यात येणार आहे असे राजेखान जमादार यांनी बोलताना सांगितले. सुरक्षा किट मध्ये सुमारे अकरा हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले या अभियानात नोंदणी झालेल्या सहाशे जणांना कार्यक्रम घेऊन सुरक्षा संच वाटप करून आणखी योजनाचा लाभ देणार असल्याचे जमादार म्हणाले
या कार्यक्रमास लखन वरपे,सागर वाघरे,हिंदुराव राऊत ,आनंदा जोंधळे , दत्तात्रय पौंडकर ,सागर कुंभार, ,प्रणव रामाणे , यांचेसह महिला बांधकाम कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.