मुरगूडमध्ये चार पानपट्टीवर टाकलेल्या धाडीत ९ हजाराचा माल जप्त ; तर चार जणांवर मुरगूड पाेलीसात गुन्हा नाेंद

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूडमधील बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या चार पानपट्टी वर मुरगुड पोलिसांनी धाड टाकली.व बेकायदेशिर व्ही १ तंबाखू,विमल पान मसाला,हिरा पान मसाला,राज जर्दा तंबाखू आदि विक्री करत असल्याला माल जप्त केला आहे. सुमारे ९२८७ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांच्यावर मुरगूड पाेलीसात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
याबाबत मुरगूड पाेलीसांनी दिलेली माहीती अशी की मुरगूड येथील मारुती मंदीर शेजारील ताज पानपट्टी,गणपती मंदीर शेजारील संताेष पानपट्टी,तुकाराम चाैकातील लकी काॅर्नर व जगदंबा पानपट्टीवर आज मुरगूड पाेलीसांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये ९ हजार २८७ रुपयाचा बेकायदेशिर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने ताे माल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पानपट्टी चालक मुसा हसन शिकलगार ( ६५ ),संताेष बाळासाहेब तेली ( ३० ), तोफिक दस्तगीर शिकलगार ( ३५ ),विजय बाळासाे माेरबाळे ( ३२ )सर्व रा.मुरगूड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास मुरगूड पाेलीस करीत आहेत.
.