ताज्या बातम्याभारतराजकीय

KARNATAK ELECTION : कोगनोळीत शांततेत ८६ टक्के मतदान; दोन बुथवर व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

कोगनोळी :

कर्नाटक विधानसभेसाठी काल राज्यभर उत्साहात मतदान पार पडले. निपाणी विधानसभा मतदार संघातील कोगनोळी येथे ८६.३३ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. ९६७० एकूण मतदारांपैकी ४२७० पुरुषांनी तर ४०७९ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. कोगनोळीत एकूण ९ बुथवर तर हनबरवाडीतील एका बुथवर हे मतदान पार पडले.

कोगनोळी येथील बुथ क्रमांक सहा वरती माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सकाळी साडेसात वाजताच मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत होते. मतदान केंद्रापासून 300 मीटर लांबीवर मर्यादा रेषा आखून पोलिसांकडून हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना व वाहनांना अटकाव करण्यात येत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एका पोलीस उपनिरीक्षकांसह २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच प्रत्येक बुथवर एक असे सशस्त्र सीमा सुरक्षा दलाचे बारा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड

बूथ क्रमांक तीन व बुध क्रमांक दहा मधील व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याने नवीन यंत्र जोडण्यात आले. बूथ क्रमांक दहा मध्ये सातच मतदार शिल्लक होते तेवढ्यात यंत्रात बिघाड झाल्याने नवीन यंत्र जोडून मतदान पूर्वत करण्यात आले.

सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान

दुपारच्या उन्हाचा तडाखा पाहता मतदारांनी सायंकाळी मतदान करणे पसंत केल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks