भुदरगड तालुक्यातील १९ गावात मिळून ४८ पॉझिटिव्ह; लॉकडाऊन पाळा : डॉ सचिन यत्नाळकर

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्याच्या १९ गावात मिळून ४८जनांना कोरोनाची बाधा झाल्याने भुदरगड च्या प्रशासनातून चिंता व्यक्त केली जात आहे.लोकांनी लॉकडाऊन पाळावे आणि कोरोना संसर्गाला टाळावे असे आव्हाहन भुदरगड तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन यत्नाळकर यांनी केले आहे.
आज सोमवार दिनांक २४ मे रोजीचा हा अहवाल सर्वांच्या भुवया ताणवणारा ठरला आहे.आजघडीला गारगोटी कोविड सेंटरला १५१ कोरोना पॉझिटिव्ह पेशंट उपचार घेत आहेत.तर संशयीत रुग्ण ४८ गारगोटी येथील स्वतंत्र कक्षात उपचार घेत आहेत.
आजही गारगोटीत सर्वाधिक १३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.पाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कदमवाडी गावात आजही ११ कोरोना पेशंट सापडले आहेत. पाठोपाठ मडिलगे बु येथे ४ कोरोना पेशंट सापडले आहेत.नागणवाडीला आजही ३ कोरोना रुग्ण सापडले आहेत.कूर व आरळगुंडी येथे प्रत्येकी २ कोरोना रुग्ण आढळले आहेत.शिवाय पुष्पनगर, भेंडवडे, उकीरभाटले, कलनाकवाडी, हेदवडे, मडूर, खेडगे, ममदापूर, मठगांव, वाघापूर, पाळ्याचाहुडा, फणसवाडी व कोनवडे या गावी प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला आहे.कोरोनाच्या या वाढत्या संसर्गामूळे प्रशासनातून चिंता व्यक्त होत आहे.या पार्श्वभुमीवर जनतेने सतर्क राहून लॉकडाऊनचे नियम पाळावेत, मास्क,सँनिटायझर वापरावे कोणत्याही परिस्थीतीत कोरोनापासून स्वत:चा बचाव करावा असे आवाहन डॉ सचिन यत्नाळकर यांनी केले.