
चंदगड : मष्णू पाटील
स्पर्धेतूनच आपल्याला प्रेरणा मिळते. कौतुकाची पाठीवर पडणारी एक थाप आपल्या जीवणाला कलाटणी देऊन जाते. आपल्या भावनांना , संवेदना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच सर्वोत्तम माध्यम आहे.आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी माता, माती आणि मातृभाषेच्या सेवेच व्रत घेणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन सौ नंदा फर्जद यांनी केले.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धाच्या बक्षिस वितरण समारंभात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.एन. शिवणगेकर होते. प्रास्ताविक बी.एन. पाटील यांनी केले. स्वागत एस.जी. साबळे यांनी केले.
संस्कृती टिकली तर भाषा टिकते भाषा टिकली तरच माणूस जात टिकेल म्हणून भाषा जगवूया “असे मत एम.एम. तुपारे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एमएम. शिवणगेकर म्हणाले की, ” भाषा ही जगण्याचे साधन बनले पाहिजे तरच तीचे महत्व सर्वसामान्यांना कळेल. “
वेद इंन्स्टयुटूडचे व्यवस्थापक अजित कडूकर यांनी मराठी अध्यापक संघाने राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा गौरव केला.यावेळी प्राचार्य व्ही.जी. तुपारे, प्राचार्य वाय. व्ही. कांबळे, सरपंच शिवाजी तुपारे, एम.एम. गावडे, टी. टी. बेरडे, शाहू पाटील यांची मनोगते झाली.
राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेला
तालुक्यातून ५४० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
तालुकास्तरीय घोषवाक्य स्पर्धेत
प्रथम – गौरी राहूल बोकडे
(महात्मा फुले विद्यालय, मजरे कारवे )
द्वितीय -. धनश्री महादेव शिवणगेकर
प(बागिलगे डुक्करवाडी विद्यालय )
तृतीय- अनुष्का अनंत धोत्रे
(विद्या मंदिर गुडेवाडी )
चतुर्थ- प्रज्ञानामदेव बेनके
(कुमार विद्यामंदिर ,बसर्गे )
पाचवा – देविका विशाल बल्लाळ
(प्राथमिक विद्यामंदिर ,हेरे )
स्वरचित काव्यलेखन स्पर्धा
प्रथम -स्वराजंली बाबूराव पाटील
जनता विद्यालय ,तुर्केवाडी
द्वितीय -संध्या बाळू नाईक
विद्यामंदिर मौजे कारवे
तृतीय- मानसी संतोष घवाळे
संजय गांधी विद्यालय, नागनवाडी
चतुर्थ-स्वरा सचिन शिरगावकर
धनंजय विद्यालय , नागनवाडी
पाचवा -सानिका विठ्ठल पाटील
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड
पाचवा -स्नेहा विश्वनाथ मंडलिक
भानेश्वरी विद्यालय आमरोळी
कथा लेखन
प्रथम -अस्मिता खेमाण्णा बोकडे
धनंजय विद्यालय नागनवाडी
द्वितीय -अपूर्वा प्रमोद देसाई
दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड
तृतीय- संदेश सुधाकर देसाई
श्रीराम विद्यालय, कोवाड
चतुर्थ- नम्रता नामदेव ओऊळकर
मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी
पाचवा – प्रज्ञा पांडूरंग कदम
(जनता विद्यालय, तुर्केवाडी )
राज्यस्तरीय उखाणा स्पर्धेत
महिला गट –
प्रथम -सौ. शिवानी कणकेकर, शास्त्रीनगर, कोल्हापूर
द्वितीय -सौ. माधुरी सावंत भोसले उत्साळी
तृतीय- साईसुधा विलास वनम, अहमदनगर
विभागून
तृतीय-योगीता युवराज पाटील , निट्टूर
चतुर्थ- सौ. पूजा सुतार, शिनोळी
पाचवा- सौ.नंदा बाळू फर्जद
तुर्केवाडी
पाचवा -सौ. स्मिता अशोक पाटील, शिवणगे
पुरुष गट –
प्रथम -श्री.पी.एम. शहापूरकर, मांडेदुर्ग
द्वितीय – सूरज विठ्ठल तुपारे, मजरे कारवे
कार्यक्रमाला एम.वाय. पाटील, सचिन शिरगावकर,
एस.पी. पाटील,व्ही.एल. सुतार ,संजय साबळे उपस्थित होते.सूत्रसंचालन रवि पाटील
आभार एच.आर. पाऊसकर यांनी मानले.