ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला नॅशनल को-जन पुरस्कार प्रदान , स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अवॉर्ड ; पुण्यात संपन्न झाला पारितोषिक वितरण सोहळा

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला नॅशनल को- जन अवॉर्ड वितरण कार्यक्रमांमध्ये “स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अवॉर्ड” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पेशल कॅटेगिरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अवॉर्ड या विभागातून कारखान्याला हे पारितोषिक मिळाले. को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे पारितोषिक वितरण झाले.

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ व जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संयोजक संजय खटाळ, जयप्रकाश दांडेगावकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमात बी. ए. पाटील यांना व्यवस्थापकीय
या विभागातुन “बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला आत्तापर्यंत को-जनरेशनमध्ये केंद्रीय पातळीवर तसेच मेडाकडून अशी गेल्या दहा वर्षात पाच पारितोषिके मिळाली आहेत. त्यामध्ये हे राष्ट्रीय पातळीवर मानाचे आणखी एक सुवर्णपान आज जोडले गेले. ही मेहनत आपल्या संपुर्ण सरसेनापती संताजी ग्रुपची असुन यामध्ये संस्थापक नामदार हसनसाहेब मुश्रीफ, माझे सर्व सहकारी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, व्यवस्थापकीय उच्च पदाधिकारी, सर्व इंजिनिअर्स तसेच संपुर्ण को – जन स्टाफसह सर्व सहकारी कर्मचारी यांचे संघटित यश आहे. यामध्ये सस्व संबंधित विभाग यामध्ये इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट विभाग, WTP विभाग व संपुर्ण technical team यांचे हे संमिश्र योगदान म्हणजे आजचा सुरेख पारितोषिक सोहळा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks