राधानगरी : कसबा तारळे परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल चे वितरण

कुडूत्री प्रतिनिधी :
कौलव जिल्हा परिषद मतदार संघातील क!! तारळे परिसरातील मागासवर्गीय ६० विद्यार्थ्याना जिल्हा परिषद सदस्य मा.पांडुरंग भांदिगरे यांच्या समाजकल्याण निधीतून ६० सायकल वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी बोलताना मा.पांडुरंग भांदीगरे म्हणाले ” आपण समाजसेवेचे व्रत स्विकारले असून या पुढेही या मतदार संघाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी भोगावतीचे माजी संचालक शिवाजी पाटील तारळेकर,शिवम शिक्षण संस्था राशिवडे या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष,दिगंबर टीपुगडे,यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत शाहू चौगले यांनी केले. आभार विकास पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास सरपंच अशोक कांबळे, दत्तात्रय पाटील, शिवाजीराव पाटील ऍडवोकेट उमेश पाटील, आनंदराव कांबळे, राजू व्हरकट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.