शाहू महाराज स्कूलमध्ये चाईल्डलाइन जनजागृती कार्यक्रम संपन्न
Childline awareness program completed in Shahu Maharaj School

कोल्हापूर:
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत ०ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना चाईल्डलाईन या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली यामध्ये १०९८ या क्रमांकाविषयी माहिती देण्यात आली व सदर नंबर वरची सेवा २४ तास उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले यामध्ये हरवलेल्या, सापडलेल्या, शारीरिक लैंगिक, शोषणास बळी पडलेल्या, अनाथ, बेवारस, निराधार, भावनिक आधाराची गरज असलेल्या, निवासाच्या शोधात असलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात इत्यादी माहिती देण्यात आली व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमास अनुजा खुरंदर, अस्मिता पवार, जीवन शिकलगार, अतुल चौगुले तसेच संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक जे आर जोशी, ज्येष्ठ शिक्षिका मीना मोहिते, बी एस कांबळे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.