गरीब अपघाताग्रस्त कुटुंबाला मिळाला मदतीचा हात समाजमाध्यमातून जमा झालेला निधी केला कुटुंबाच्या स्वाधीन

गडहिंग्लज प्रतिनिधी:सोहेल मकानदार
बांद्राईवाडा तालुका चंदगड येथील कुटुंबाचा गेल्या दोन महिन्यामागे भीषण अपघात झाला .
यावेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींवर उपचार करण्यासाठी पुरेसे पैशे नव्हते
मग ही बाब काही मंडळीना लक्षात आली आणि त्यांनी समाज माध्यमातून मदतीचे अहवान केले, मग जमेल तसे लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला.
सर्व रक्कम एका खात्यात जमा करून रक्कमेचा धनादेश शनिवारी दिनांक १७ एप्रिल रोजी कुटुंबातील व्यक्तींच्या स्वाधीन केला.
या वेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर , शिवसेना सह संपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, श्री.सूर्यकांत कडाकणे , पुंडलिक पाटील, डॉ. प्रशांत कदम, महादेव गुरव, हेरे मंडल सर्कल, तलाठी आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी यांनी शासकीय योजनेतून जी मदत करता येईल ती करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.