गणेश पतसंस्थेला १.३४ कोटीचा नफा

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेस २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी ३४ लाख रुपये नफा झाला असून वार्षिक उलाढाल ४४२ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती एकनाथ पोतदार सभापती यांनी दिली.
स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने अवध्या ३३ वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष होऊन लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हातभार लागला आहे. अहवाल सालात ठेवी ६१ कोटी ३१ लाख, कर्ज वितरण ४४ कोटी १ लाख पैकी सोने तारण कर्ज १८ कोटी ३१ लाख आहे. गुंतवणूक २४ कोटी ७५ लाखांची केली आहे. संस्थचा एकूण व्यव्हार ४४२ कोटी ६३ लाख असून, यकबाकी ०.३५ टक्के, तर ऑडिट वर्ग अ मिळाला असल्याचे पोतदार यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती मंगल वरनावकर, संचालक उदय शहा, सुखदेव एरुडकर, आनंदा देवळे, मारुती पाटील, खाशाबा भोसले, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे भारती कुडवे, कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. स्वागत व प्रास्ताविक उदय शहा यांनी. तर आभार सोमनाथ येरनाळकर यांनी मानले.