आम आदमी रिक्षाचालक संघटनेकडून निर्जंतुकीकरण मोहीम ! 85 रिक्षा थांब्यावर होणार निर्जंतुकीकरण

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या व रिक्षा मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काळजी घेत प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने रिक्षाची निर्जंतुकीकरण मोहीम राबिवण्यात आली.
या मोहिमेची सुरुवात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छत्रपती शाहु महाराज रिक्षा थांब्यावरून ‘आप’चे पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष आणि आम आदमी रिक्षा चालक संघाटनचे मार्गदर्शक संदीप देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. ही मोहीम रिक्षाचालक तसेच रिक्षातील प्रवाशांची सुरक्षितता वाढवन्यासाठी सुरु करण्यात आली असुन, येत्या काही दिवसात शहरातील सर्व 85 रिक्षा थांब्यावर निर्जंतुकीकरण मोहीम राबवणार असल्याचे संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष लाला बिरजे, प्रकाश हरणे, बाबुराव बाजारी, विजय भोसले, महेश घोलपे, रामचंद्र गावडे, विशाल वाठारे, संजय सुर्यवंशी, मंगेश मोहिते, धनाजी देसाई, कृष्णा सुर्यवंशी, तसेच आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटक सुरज सुर्वे, इत्यादी हजर होते..