मुरगूडमध्ये वेदगंगा नदीची युवकांकडून स्वच्छता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहरातील दत्त मंदिर येथे वेदगंगा नदीत सांडपाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते. या पाण्यात प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि कचरा तरंगताना दिसून आल्यामुळे येथील शिवभक्त समाजसेवक युवकांनी नदी स्वच्छता करण्याचे ठरवले. युवकांनी एकत्र येत तब्बल तीन तास काम करून तो कचरा काढून तो ट्रॅक्टर मधून बाहेर टाकण्यात आला.
शिवभक्त समाजसेवक आणि मुरगूड शहरातील युवकांनी आपली नदी आपण स्वच्छ करूया, असे आवाहन केले होते. त्यानुसार, सकाळी सहा वाजल्यापासून युवक नदी घाटावर जमण्यास सुरुवात झाली त्यानंतर नदीमध्ये जात नदीमध्ये असलेला कचरा काढण्यास सुरुवात केली. यामध्ये तब्बल अर्धा टनाहून अधिक कचरा ज्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे प्लास्टिकचे पाऊच, जुने कपडे, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, मेडिकलचे साहित्य, उरलेले अन्न अशा प्रकारचा कचऱ्याचा समावेश होता. सांडपाणी नदीमध्ये गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाण्याला प्रचंड खाज येत होती त्याची तमा न बाळगता युवकांनी पाण्यामध्ये जात हा कचरा काठावर एकत्र आणला.
या केलेल्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवकांना नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकण्यासाठी अनेक कचरा घेऊन जाण्यासाठी सहकार्य लाभले, संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये शिवभक्त सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, कुरणी ग्रामसेवक रघुनाथ बोडके, अमर सुतार, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश पारशवाड, संकेत शहा, जगदीश गुरव, तानाजी भराडे या युवकांचा सहभाग होता.