ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : अडकुर येथील मेगा आरोग्य शिबिराचा २२०० रुग्णानी घेतला लाभ

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

महाराष्ट्र राज्यातील चंदगड तालुक्यातील अडकुर शहरात मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील सुमारे २२०० रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घेतला.

केएलई डॉ प्रभाकर हॉस्पिटलमधील विशेष डॉक्टरांची टीम सल्लामसलत आणि तपासणीसाठी उपलब्ध होती. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.रक्तदाब, रक्तातील साखर, डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी, मणक्याचे आणि मेंदूची तपासणी, ईसीजी, इकोअशा सर्व तपासण्या डॉक्टरांच्या पथकाने केल्या.

रुग्णांशी समन्वय साधण्यासाठी कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, जनरल मेडिसिन, नेत्ररोग, बालरोग, शस्त्रक्रिया, ईएनटी आणि त्वचाविज्ञान विभागातील विशेष डॉक्टर उपलब्ध होते.
यावेळी आडकूर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोमजाळ, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉ.परशुराम पाटील, आडकुर येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष .जयंतदादा अडकूरकर उपस्थित होते.

डॉ.सोमजाळ (THO) यांनी उपस्थितांना संबोधित करताना गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे आरोग्य शिबिरे घेण्यावर भर दिला. गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी केएलई हॉस्पिटलने घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.डॉ.परशुराम पाटील यांनी केएलई हॉस्पिटल,बेळगावी येथे उपलब्ध असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. रुग्णांनी कोणत्याही मदतीसाठी 0831-2551117 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks