ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक दुग्धदिनानिमित्त शिंदेवाडी येथे ‘हादगा’वैरण पिकावर कार्यशाळा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

१ जून जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या गौऍग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक संस्था शिंदेवाडी, ता. कागल या संस्थेच्या वतीने “हादगा” या पौष्टिक व बहुवार्षिक वैरण पिकावर कार्यशाळा आयोजित केली होती. मार्गदर्शक म्हणून वनस्पती अभ्यासक निसर्गमित्र संस्था कोल्हापूरचे अनिल चौगुले होते.

हादगा हे बहुवार्षिक,द्विदल झुडूपवर्गीय वैरणपीक असून त्यामध्ये औषधी गुणधर्म असून त्याच्या फुलांचा वापर मानवी आहारात तर आणि फांद्यांचा, पानांचं वापर दुधाळ जनावरांच्या आहारात करता येतो पशुधनाबरोबरच हादगा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदेशीर ठरणार आहे तरी शेतकरी व पशुपालकांनी त्याचा उपयोग करावा असे आवाहन चौगुले यांनी केले.

हादगा या वैरणपिकाच्या पशुधनाच्या आहारातील महत्त्व सांगताना गौअग्रीटेक कोल्हापूर वैरण कंपनीचे मुख्य+कार्यकारी अधिकारी सयाजीराव खराडे यांनी सांगताना हादगा पिकात 60 टक्के शुष्क पदार्थ, प्रोटीन 25% इतके असलेचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश एकदल पिके असून त्यामुळे चाऱ्यातून पशुधनाला मिळणाऱ्या प्रोटीनचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यावर उत्तम पर्याय हादगा वैरणीचा वापर केल्यास जनावरांना प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळणार असून त्यामुळे जनावराची तब्येत सुधारणार असून गाभण तक्रार कमी होणे बरोबरच त्या चाऱ्यापासून तयार होणाऱ्या दुधात प्रोटीनचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी दुधाच्या गुणवतेत सुधारणा होणार आहे दुध उत्पादनही वाढणार आहे त्यामुळे दुध व्यवसाय सोपा होणार आहे गौअग्रिटेक कोल्हापूर वैरण कंपनी मार्फत येत्या काळात बनवत असलेल्या मुरघासात (सायलेजमध्ये) 80% मका व 20 टक्के हादगा वापरून पौष्टिक सायलेज बनवणेबरोबरच शेतकऱ्यांनी पिकवलेला हिरवा चारा योग्य दराने खरेदी करून पशुपालकांना विकायचे नियोजन सुरू आहे.

यावेळी कंपनीच्या शेती अधिकारी स्नेहल पाटील यांनी हादगा वैरणपीक लागवडी बाबत माहिती देताना म्हटले की, हादगा हे वैरण पिक लागवड केल्यावर किमान चार ते पाच वर्षे चालते, त्यामुळे प्रत्येक वर्षाचा उत्पादन खर्च कमी येतो. हादगा वर्षातून किमान चार वेळा कापण्यासाठी येतो तसेच या पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने हादगा शेतकऱ्यांना कमी कष्टाचे व नफा मिळवून देणारे असल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तरी शेतकऱ्यांनी हादगा पिकाची लागवड करावी, चांगल्या दरात कंपनी मार्फत खरेदी केली जाईल.

स्वागत व प्रास्ताविक योगेश खराडे यांनी केले यावेळी सागर किल्लेदार, तानाजी खराडे तुकाराम शिंदे, एकनाथ ढेरे परिसातील शेतकरी, दुधउत्पादक उपस्थित होते आभार ऋतुजा डोंगळे यांनी मानले यावेळी सवलतीच्या दरात हादगा रोपे वाटप करणेत आली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks