ताज्या बातम्या
शिवजयंतीनिमित्त बोरवडेत रत्तदान शिबीर संपन्न

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके :
शिवजयंती निमित्त बोरवडे ( ता. कागल ) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कै. तानाजी गुंडू आरेकर युवा फौंडेशन व संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी पांडूरंग आरेकर, अक्षय माजगावकर, एकनाथ आरेकर, संतोष बलुगडे, गजानन माजगावकर, तुषार आरेकर, विनायक मोरे, आदित्य आरेकर यांच्यासह फौंडेशनचे सदस्य व युवक उपस्थित होते.