साक्षी सामंत हिचे घवघवीत यश.

मुंबई :
सेंट झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन या मुंबईतील नामांकित संस्थेमधील Mass Communication and Journalism या पत्रकारितेच्या पदवीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत कु साक्षी मनीषा संजय सामंत हिने ९८.33% गुण मिळवून पहिली आली आहे. साक्षीने १२ वी शास्त्र शाखेत ९५.८४% गुण मिळवले आहेत. तिचे १ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण इंडियन स्कुल ऑफ बहरींन या आखाती देशात झाले आहे. तर त्यानंतरचे शिक्षण ठाणे, मुंबईत झाले आहे. तिच्या या यशात, तिचे सर्व शिक्षक, आई मनीषा, तिची बहीण सृष्टी सामंत, सर्व कुटुंबिय आणि सर्व सामाजिक महामानव यांचे योगदान आहे असे तिने सांगितले. पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण परदेशातील नामवंत विद्यापीठातून घेऊन समाजातील विविध समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. साक्षीचे वडील संजय सामंत यांनी स्थापत्य अभियंता म्हणून देश परदेशात काम केले असून हे कुटुंब मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील , भुदरगड तालुक्यातील एका पडखांबे नावाच्या खेड्यातील आहे. ती गारगोटी येथील प्रतिष्ठित नागरिक धोंडीराम चंद्रो सामंत यांची नात आहे.