ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गटातटाच्या राजकारणात न अडकता, गावचा विकास हेच ध्येय ठेवून वाटचाल सुरु : जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील

आजरा :
पेरणोली पैकी नावलकरवाडी येथील दत्त मंदिर सुशोभिकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्याकडे निधीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
गटातटाच्या राजकारणात न अडकता, गावचा विकास हेच ध्येय ठेवून वाटचाल सुरु असून निधीची लवकरच पूर्तता करू असे यावेळी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी सांगितले.
यावेळी संकेत सावंत, हरीभाऊ कांबळे, रवींद्र नावलकर, शिवाजी मस्कर, रामदास मस्कर, जय पवार, विजय पवार, उत्तम लोखंडे, विठोबा नावलकर, जोतीबा नावलकर, अक्षय नावलकर, सागर नावलकर, मच्छींद्र नावलकर उपस्थित होते.