ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न .

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

येथील श्री गणेश नागरी नागरी सहकारी पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. या अहवाल सालात संस्थेस १ कोटी ३४ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असुन, सभासदांना १५% लाभांश दिला आहे . अहवाल सालात ४४२ कोटी ६३लाखाची वार्षिक उलाढाल झाली असुन संस्थेकडे ६१ कोटी ३१ लाखांच्या ठेवी आहेत .योग्य तारणावर ४४ कोटी १ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे . त्यापैकी १८कोटी ३१ लाख सोने तारण कर्ज वाटप केले आहे.

संस्थेकडील थकबाकी ००.३५% तर असून अहवाल सालातील ऑडीट वर्ग ‘अ ‘ आहे . राखीव व इतर निधी ४ कोटी ५० लाख असून संस्थेची इतरत्र गुंतवणूक ही २४ कोटी ७५ लाख इतकी आहे. तर अहवाल सालातील खेळते भांडवल ७० कोटी ६२ लाख इतके आहे.

यावर्षी सभासदांना दिपावली भेट म्हणून ५ लिटर खाद्यतेल देणेत येणार आहे अशी माहिती चेअरमन एकनाथ पोतदार यांनी दिली . ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या संस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते .
प्रारंभी दीपप्रज्वलन करून अहवाल सालात मयत झालेल्या सभासदांना आदरांजली वाहण्यात आली .

अहवाल वाचन कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले.

ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेस मधुकर भोसले, शशिकांत पाटील, जयसिंग पाटील, अशोक डवरी, मधुकर पाटील , सरदार जमादार, आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी चेअरमन एकनाथ पोतदार ,व्हाईस चेअरमन श्रीमती मंगल यरनाळकर, सर्वश्री संचालक उदयकुमार शहा , आनंद देवळे, सुखदेव येरुडकर , मारुती पाटील, खाशाबा भोसले , प्रकाश हावळ , दत्तात्रय कांबळे, सौ भारती कुडवे ,कार्यकारी संचालक राहुल शिंदे, कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते .

स्वागत – प्रास्ताविक उदयकुमार शहा यांनी तर सुत्रसंचलन साताप्पा चौगले यांनी केले आभार अॅड. खाशाबा भोसले यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks