ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या गणेश नागरी सह. पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; चेअरमनपदी उदयकुमार शहा तर उपसभापतीपदी प्रकाश हावळ यांची निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथील सहकारी पत संस्थांमध्ये अग्रगण्य मानल्या गेलेल्या व स्व.खा . सदाशिवराव मंडलिक यांचे अल्पावधीत प्रगतीपथावर पोहचलेल्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली .
यामध्ये उदयकुमार छगनलाल शहा यांची सभापतीपदी तर प्रकाश बाळकृष्ण हावळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ही निवडीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. शिंदे कागल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
मावळते चेअरमन एकनाथ पोतदार व व्हा.चेअरमन श्रीमती मंगल यरनाळकर यांचा २०२१ / २२ आर्थिक सालात उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल उदयकुमार शहा व व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश हावळ यांचा निवडणूक अधिकारी श्री शिंदेसो यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
सन २०२२ ते २०२७ या सालाकरीता नवनिर्वाचित बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे :एकनाथ शंकर पोतदार , आनंदराव शंकर देवळे, मारुती गणपती पाटील, सुखदेव गणपती येरुडकर , सोमनाथ दिपक यरणाळकर, राजाराम बाळू कुडवे, आनंदा यशवंत जालीमसर , दत्तू रामा कांबळे, सौ. रूपाली भारत शहा, ॲड.सौ. रेखा खाशाबा भोसले .
ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे व सहाय्यक सचिव चिदंबर एकल यांचे मौलिक सहकार्य लाभले .या निवडीच्या बैठकीस आजी – माजी संचालक व संस्था पदाधिकाऱ्यांसह सर्व सेवक वर्ग उपस्थित होता. यावेळी ॲड.रेखा भोसले ॲड.खाशाबा भोसले सोमनाथ यरनाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले .
उपस्थितांचे स्वागत नूतन चेअरमन उदयकुमार शहा यांनी, प्रास्ताविक एकनाथ पोतदार यांनी तर आभार राहुल शिंदे यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks