ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवदूत अशी संघटना बळकट करा : उदय सावंत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसरात्र काम करीत आहेत . सर्वसामान्यासाठी विविध कल्याणकारी योजना शिंदे सरकारने दिल्या आहेत . त्यांचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवदूत अशी संघटना बळकट करावी असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निरीक्षक उदय सावंत यांनी केले .

मुरगूड येथे झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते .बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार होते . यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी सर्वासाठी पक्ष महत्वाचा असतो . पक्ष संघटना बळकट करून येणाऱ्या लोकसभा अन विधानसभा निवडणूकीला सामोरे जायचे आहे . त्यासाठी पक्षाची विचारधारा घराघरा पर्यंत पोचवणारे शिवदूत संघटनेत महत्वाचा दुवा ठरणार आहेत असे सांगितले .

यावेळी बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला . यावेळी सुधीर पाटोळे , संतोष पाटील , कागल तालुका प्रमुख रूपाली पाटील , चंदगड तालुका प्रमुख कल्लाप्पा निऊंगरे , मागासवर्ग सेलचे अनिल सिद्धेश्वर , आजरा तालुका प्रमुख संजय पाटील ,
राधानगरी तालुका प्रमुख विजय बलुगडे , कागल शहर प्रमुख महेश घाटगे , नितीन दाभोळकर यांच्या सह सहा तालुक्यातील पदाधिकारी यांच्यासह अमर सनगर,विशाल सुर्यवंशी,राजू भारमल,सचिन मेंडके,विजय मोरबाळे,समिर रावण,प्रविण मेंडके, रतन मोरबाळे,राजू महाजन,आकाश दरेकर,राहुल पाटील,बबन बाबर,प्रशांत पाटील,नितीन वाडेकर, अभिजित कांबळे,संदिप सनगर उपस्थित होते .

बैठकीत स्वागत मुरगूड शहर प्रमुख राहुल पाटील यांनी , प्रास्ताविक सुधीर पाटोळे यांनी केले . तर आभार राधानगरी तालुका प्रमुख विजय बलुगडे
यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks