आदमापूर येथील राणादा युवा विकास फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक विकासाला वाहून घेणार : विकास पाटील

निकाल न्यूज प्रतिनिधी – विजय मोरबाळे
नव्याने स्थापन झालेल्या आदमापूर (ता.भुदरगड) येथील राणादा युवा विकास फौंडेशन च्या माध्यमातून येणाऱ्या काळात सामाजिक विकासाला वाहून घेणार असल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक,राणादा उर्फ विकास कुंडलिक पाटील यांनी दिली.धर्मादाय आयुक्त कोल्हापूर च्या निरीक्षक रागिणी खडके यांच्या हस्ते हे संस्था रजिस्ट्रेशन पत्र प्रदान करण्यात आले. रजि.क्र.११०/२०२५ ने संस्थापक राणादा विकास पाटील यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून हे पत्र स्विकारले.
यावेळी माहिती देताना राणादा, विकास पाटील म्हणाले की,” अलिकडच्या काळात समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करणारी माध्यमे खूप कमी होत आहेत. या संबंधाने आपण या संस्था स्थापनेचा निर्णय घेतला आहे. आमच्या गत जीवनातील अशा अनेक सामाजिक प्रसंगात आम्ही सहभागी होवून आमची फूल ना फुलाची पाकळी समाजासाठी देत आलो आहोत.या दातृत्वासाठी काही तरी माध्यम असावे या हेतूने आंम्ही हा संस्था प्रपंच उभा केला आहे. गावच्या प्राथमिक शाळेच्या उभारणीत आम्ही आमच्या परिने मदतीची सेवा दिली आहे. आदमापूरचे प्रसिद्ध देवस्थान सद्गुरू बाळूमामा देवस्थानकडे आम्ही वडिलांच्यापासून सेवा देत आलो आहोत.गावच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेत लहान मुलांना शुध्द पाणी पिता यावे यासाठी अँक्वागार्ड ची सुविधा तयार करून दिली आहे.
या साऱ्या विकास कामात आदमापूर चे सरपंच, उपसरपंच , ग्रा.प सदस्य, ग्रामसेवक व त्यांचा सर्व स्टाफ, ग्रामस्थ आदमापूर तसेच सदगुुरू बाळूमामा देवस्थान मंडळ आदमापूर,गावातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, या साऱ्यांच्या प्रेरणेने नी मी ही सामाजिक विकासाची मुहुर्तमेढ रोवली असल्याचे राणादा विकास पाटील या प्रसंगावेळी म्हणाले.याचे समाधान मला मिळत आले असल्याचे शेवटी ते म्हणाले.