ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

‘अरे एवढी गर्दी कशाला, ग्द्धाराला गाडायला!’; कोल्हापूर येथील शिवसैनिक आक्रमक; आमदार प्रकाश आबिटकर व राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी; व्हिडीओ होतोय व्हायरल.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हाया सुरत गुवाहाटी मध्ये काही दिवसांपूर्वी दाखल झाले तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर काल गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच माजी आमदार उपस्थित आहेत. दुसरीकडे चलबिचल असलेल्या खासदार धैर्यशील माने यांची अनुपस्थितीने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.  

फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील, असा इशाराच शिवसैनिकांनी यावेळी दिला. पक्षप्रमुखांचा आदेश, पुन्हा नाही राजेश अशा घोषणही यावेळी देण्यात आल्या. जे गेले ते कावळे, उरले ते मावळे अशाही घोषणाही देण्यात आल्या. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. दरम्यान, काल दिवसभरात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे पण नॉटरिचेबल होते. त्यामुळे ते शिंदे गटाला जाऊन मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालेही तसेच.

राजेश क्षीरसागर आज गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील राज्य आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एक माजी आणि एक आजी आणि एक अपक्ष असे तीन आमदार शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks