ताज्या बातम्यामहाराष्ट्र
“सहा कशाला, दहा जागा घ्या” : मुश्रीफांचे शिवसेनेला उत्तर.

KOLHAPUR :
शिवसेनेचे सहा आमदार पूर्वी निवडून आले होते. आता पुन्हा एकदा सहा आमदार निवडून आणण्याची घोषणा रविवारी झालेल्या शिवसेना मेळाव्यात करण्यात आली. त्याबाबत विचारता मुश्रीफ यांनी सहा कशाला बारा जागा घ्या, असे म्हणत पूर्वीच्या विधानसभा जागांचा संदर्भ दिला. मात्र लगेच हे दुरुस्त करीत त्यांनी “सहा नको, दहाही जागा घ्या”. सहा म्हणजे खूप कमी जागा होतात, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले.