कोरोना काळात गुळवेल वनस्पती इतकी गुणकारी का ठरतेय? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👇🏻👉🏻

गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास गुळवेल सत्व घेतले जाते. संधिवात व अन्य वात, व्याधींवर उपयोगी आहे. गुळवेल शक्तीवर्धक आहे, मानसिक व्याधीवर उपयोगी आहे.
ज्वरनाशक आहे. डेंग्यू तापामध्ये रुग्णाच्या रक्तातील श्वेत रक्त पेशींचे (प्लेटलेट) प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना गुळवेलचा काढा किंवा सत्व दिल्यास रक्तपेशी लवकर सामान्य होतात.
शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास वारंवार सर्दी-पडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेल च्या सेवनाने रक्ताची स्वच्छता, निरोगी पेशी राखून, शरीराला हानी पोचविणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढा देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.

गुळवेली मुळे मधुमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह, अंधत्व इत्यादी टाळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
यकृतातून रक्तप्रवाहात शर्करा मिसळली जाते. त्यामुळे इन्सुलिन ची चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखर नियंत्रित होते.
संधिवात व अन्य वातव्याधी वर उपयोगी आहे गुळवेल शक्तीवर्धक आहे मानसिक व्याधीवर उपयोगी आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्करेचे प्रमाण कमी करते, मुळव्याध विकारांवर सुद्धा गुळवेल गुणकारी व उपयोगी आहे.
ताप, तहान, जळजळ, वातीवर उपयुक्त आहे. रक्त सुधारक आहे
गुळवेलच्या सेवनाने भूक लागते. अन्न पचन चांगले होते. रोग्याचा फिकटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.