राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर आज सकाळी 9.45 वाजता आगमन झाले. त्यांच्यासोबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वागत केले.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शितल मुळे-भामरे आदी उपस्थित होते. सांगली येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.