गावाने दिलेला पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार : डॉ .श्रीकृष्ण देशमुख ; मुरगूड मध्ये शिवपूरस्काराने सन्मान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले पण ज्या गावाने घडविले प्रेम आपुलकी दिली त्या गावाने त्या लोकांनी पुरस्कार देऊन सन्मान केला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे भावनिक उदगार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवचनकार डॉ श्रीकृष्ण देशमुख यांनी काढले.
मुरगूड ता .कागल येथील ज्ञानेश्वर पाटील कॉलनी च्या वतीने शिवजयंती निमित्त डॉ देशमुख यांना शिव पुरस्कार देऊन सन्मानित केले.यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी उद्योगपती मोहनराव गुजर होते.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रविनसिंह पाटील,गोकुळ चे संचालक नविद मुश्रीफ,नगराध्यक्ष राजेखान जमादार,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नाडिस उपस्थित होते.
दरम्यान चिकोडी येथील शिव शंभो मर्दानी आखाड्याच्या पंचवीस तरुणांनी पारंपरिक खेळांची थरारक प्रात्यक्षिके दाखविली.तर बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक के एस चौगले,संताजी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय घाटगे व अभिजित यादव यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रास्ताविक जीवन साळोखे यांनी केले.यावेळी रवींद्र शिंदे यांनी आभार मानले.अनिल पाटील यांनी निवेदन केले.मुरगूड पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी भेट देऊन मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमास संतोष रणवरे,निशांत गुजर,अनिल दिवटे,समाधान रावण,सुहास रावण,हर्षवर्धन मोरबाळे,योगेश ननवरे, मनोज परीट,सुशांत भोसले,अनिल राय जाधव,विक्रम गुजर,वैभव अर्जुने,प्रतीक पाटील,वैभव चव्हाण,शिवम लोहार,विकास मोरबाळे,रोशन रणवरे, नागरिकांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती.
अन डोळ्यात अश्रू तरळले
अंधश्रद्धा,डोळस भक्ती,संत साहित्य या विषयावर डॉ देशमुख यांनी हजारो प्रवचने दिली.अगदी परदेशात ही त्यांनी व्याख्याने दिली.आपल्याला मिळालेल्या पुरस्काराला वारकरी संप्रदायाचे अनुष्ठान असल्याचे सांगून गावाने केलेला सन्मान मोठा सन्मान असल्याचे सांगत असताना देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू तरळले यावेळी वातावरण धीरगंभीर बनले.