ताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हासुर्ली येथील महिला सरपंचांना अपमानास्पद वागणूक व धमकी प्रकरणी दोघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

कळे वार्ताहर : अनिल सुतार

म्हासुर्ली ता. राधानगरी येथील महिला सरपंच यांना अपमानास्पद वागणूक व धमकी दिल्या प्रकरणी येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सखाराम पाटील रा.म्हासुर्ली ता.राधानगरी व संभाजी कृष्णा वडाम रा.म्हासुर्लीपैकी सावतवाडी ता. राधानगरी या दोघांवर राधानगरी पोलीस ठाण्यात जातीवाचक गुन्हा दाखल झाला आहे .याबाबतची फिर्याद सरपंच मीनाताई भिमराव कांबळे यांनी दिली असून पुढील तपास शाहुवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जे बी सूर्यवंशी करत आहेत.

याबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, म्हासुर्ली येथील मीनाताई भीमराव कांबळे यांची अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातून सन 2021 साली सरपंच म्हणून निवड झाली आहे. सौ.कांबळे या मागासवर्गीय महिला सरपंच असल्यामुळे तत्कालीन उपसरपंच आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटील व संभाजी वडाम ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना वारंवार सभेवेळी अपमानास्पद वागणूक देत होते.

तसेच मिटींगवेळी संभाजी वडाम हे तंबाखू खाणे,बाहेर जाऊन सतत थुंकणे यामुळे ग्रामपंचायत कामात नेहमी जाणुन बुजुन अडथळा आणत असतात तसेच महिला सरपंच अवमान करणे त्यामुळे सन 2022 मध्ये अपमानास्पद वागणुकीला कंटाळून तक्रार दाखल केली होती अशातच 28 मार्च 2023 रोजी म्हासुर्ली ग्रामपंचायती मध्ये मासिक मीटिंग वेळी सदस्य राजेंद्र पाटील व संभाजी वडाम हे सरपंचांना गावातील सुरू असणाऱ्या रस्त्याच्या अपूर्ण कामाची नियमबाह्य ताबा पट्टी देण्यास सांगत होते.

मात्र काम अपूर्ण असल्याने सौ.कांबळे यांनी ताबापट्टी देण्यास विरोध केला त्यावेळी राजेंद्र पाटील यांनी तुम्ही ताबा पट्टी दिली नाही तर तुमच्या हाताला धरून बाहेर ओढून काढायची आमच्यात हिम्मत आहे तुम्ही सरपंच आता झाला आहात असे अपमानास्पद बोलून सरपंच व उपसरपंच सह तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली यावेळी संभाजी वडाम हे महिला उपसरपंच यांना जर सरपंच यांनी सही नाही केली तर तुम्ही सही करा नाही तर बघून घेतो अशी धमकी देऊन ग्रामपंचायत सभागृहातून बाहेर निघून गेले.यामुळे येथील सरपंच मीनाताई कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र पाटील व संभाजी वडाम यांच्या विरोधात अपमानास्पद वागणूक व धमकी दिल्या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आचार संहितेत गुन्हा दाखल….
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली हे गाव बारा वाड्यावस्त्यांची ग्रामपंचायत असून परिसरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.सध्या या ग्रामपंचायतीतील अतिक्रमणामुळे अपात्र झालेले सदस्य पद रिक्त असून दि ५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाली आहे .ऐन आचारसंहिता काळात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.तर दुसरीकडे सदस्य राजेंद्र पाटील व संभाजी वडाम यांच्या ातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks