ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांचा सत्कार

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
आजरा पोलीस ठाणेकडे लाभलेले नूतन पोलीस उपनिरीक्षक कुमार दत्तात्रय ढेरे यांचा औपचारिक सत्कार पत्रकार पुंडलिक सुतार,राजेंद्र जाधव,मारुती लोहार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी श्री ढेरे यांनी तालुक्यातील जनतेने कायदा व सुव्यवस्था चांगली राखणेसाठी सदोदित सहकार्य करावे असे यावेळी बोलताना सांगितले. श्री ढेरे यांनी आतापर्यंत मुंबई, गडचिरोली,मुरगुड आदी पोलीस ठाणेकडे मिळून 8 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे.